आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:साडेपाच लाख लूटमारीत टेम्पाेचालकच मुख्य आराेपी ; पूड टाकून पैसे लुटल्याचा केला बनाव

बिडकीन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेकटा-बिडकीन रस्त्यावर टेम्पाे अडवून साडेपाच लाख रुपये लूटमार प्रकरणात फिर्यादी टेम्पाेचालकच या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समाेर आले आहे. पाेलिसांनी पाच आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, राेख साडेचार लाख रुपये जप्त केले. १ ऑक्टाेबर राेजी विहामांडवा येथील टेम्पोचालक गोपाल भगवान निकम (१९, रा. विहामांडवा) व त्याचा सहकारी दत्ता बाबूराव कोरडे (२१) हे दाेघे जितू पहाडे यांच्या विराज अॅग्रोटेक मिलमधून १०० कट्टे शेंगदाणे सटाणा येथील लक्ष्मी ऑइल मिलमध्ये पाेहाेचवण्यासाठी गेले हाेते. तेथून ५ लाख ५८ हजार रुपये घेऊन टेम्पोने (एमएच १६ सीसी १०९४) परत निघाले. तेव्हा गिधाडा शिवारात दुचाकीवर आलेल्या तिघांनी डाेळ्यात मिरची पूड टाकून ही रक्कम लुटली हाेती. त्यावरून बिडकीन पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

मोबाइल सीडीआरवरून लागला शाेध : पाेलिसांनी फिर्यादी निकम व कोरडे यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली. तसेच दाेघांच्या मोबाइल सीडीआरची तपासणी केली. तेव्हा निकम हाच मुख्य आराेपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून गोपाल निकम, दत्ता कोरडे, ज्ञानेश्वर गणेश कोलते (२२, रा. रोषणगाव, ता. बदनापूर), देवसिंग निहालसिंल दुल्लत (२१, रा. परदेशवाडी, कंडारी, ता. बदनापूर), बाळू ज्ञानेश्वर अंभोरे (२०, रा. कस्तुरवाडी, ता. बदनापूर) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ६ ऑक्टाेबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...