आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात तापमान @ 12.4:दोन दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या पाच दिवसांपासून दाटलेल्या धुक्याची तीव्रता शनिवारी किंचित कमी झाली. किमान तापमान दोन दिवसांपासून १२.४ अंश सेल्सियसवर स्थिर आहे. कमाल तापमानात दोन अंशांनी वाढ होऊन ते २७.६ अंशांवर गेले होते. पुढील दोन दिवसात उत्तरेतील अतिशीत वारे दाखल होऊन पारा पुन्हा दहा अंशाखाली जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढणार आहे.

आठवड्यातील दोन दिवस तीव्र थंडी तर पाच दिवस उष्णता, दमट वातावरण राहत आहे. गेल्या पाच दिवसांपासून तीव्र धुक्याची लाट राहिली. शुक्रवारी दाट धुक्यामुळे दृश्यमानता ५०० मीटरवर आल्याने हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली विमानसेवा विस्कळीत झाली होती.

बातम्या आणखी आहेत...