आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Temperatures Crossed 42 0 In 18 Cities In The State; Khandesh Vidarbha Hurricane, 3 More Days Of Heat Wave, Cloudy Weather Forecast Elsewhere In The State

भुसावळ@47:राज्यात 18 शहरांत तापमान 42 अंश पार; खान्देश-विदर्भाची होरपळ, इतरत्र ढगाळ हवामानाचा अंदाज

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगालच्या उपसागरातील असनी चक्रीवादळाने हवेतील बाष्प शोषून घेतल्याने खान्देश आणि विदर्भ अक्षरश: होरपळून निघत असून सोमवारी भुसावळ येथे सर्वाधिक ४७.२ अंश सेल्सियस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर राज्यातील १८ शहरांमध्ये तापमान ४२ अंश सेल्सियसवर गेले आहे. खान्देश आणि विदर्भामध्ये आणखी दोन ते तीन दिवस हा उष्णतेचा कहर कायम राहणार आहे.

खान्देशातील तीन जिल्हे आणि विदर्भ वगळता उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि मराठवाड्यातील औरंगाबादसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात सोमवारी ढगाळ वातावरण होते मात्र उष्णताही तीव्र जाणवली. मे महिन्याचा पहिला आठवडा यंदा अधिक हाॅट ठरला आहे. ढगाळ वातावरणात देखील उष्णतेची लाट अधिक तीव्र पातळीवर आहे.

प्रमुख शहरांतील कमाल तापमान
भुसावळ ४७.२
जळगाव ४५.८
अकोला ४५.८
परभणी ४४.४
सोलापूर ४४.३
ब्रह्मपुरी ४४.२
वर्धा ४४.०
अहमदनगर ४३.६
वाशीम ४३.५
यवतमाळ ४३.५
अमरावती ४३.४
चंद्रपूर ४३.४
औरंगाबाद ४३.२
गोंदिया ४३.२
नागपूर४३.१
नांदेड ४२.८
उस्मानाबाद ४२.४
बुलडाणा ४२.०
सातारा ४०.०
नाशिक ३९.१

चक्रीवादळाने हवेतील बाष्प शोषल्याने लाट
‘असनी’ हे तीव्र चक्रीवादळ पश्चिमेकडे पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील हवेतील बाष्प त्याच्याकडे ओढून घेत आहे. मुळात विदर्भ व उत्तर महाराष्ट्राचा भाग आधीच कोरडा आहे. त्यात पुन्हा हवेतील बाष्प कमी होत असल्याने तापमानाची तीव्रता जास्त आहे. किमान १२ मेपर्यंत उष्णतेची स्थिती राहील, असा अंदाज आहे,असे पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

उष्णतेची उलटगणती सुरू, १३ मेनंतर पारा घसरणार
अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली

हवामान वेगाने बदलत असतानाच दिलासा देणारी बातमी आली आहे. १३ मेनंतर राजस्थान वगळता देशात कुठेही उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही. ११,१२ आणि १३ मे रोजी दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि अर्ध्या मध्य प्रदेशात उष्णता वाढेल, पण १४ मेपासून तापमानात सतत घसरण सुरू होईल. ही स्थिती २४ मेपर्यंत राहील. तथापि, त्यानंतर काही दिवसांपर्यंत तापमानात किरकोळ वाढ होऊ शकते. पण केरळमध्ये पावसाचे आगमन होताच मध्य भारतात मान्सूनपूर्व पाऊस सुरू होईल. यंदा अंदमानमध्ये मान्सून केरळपेक्षा १२-१३ दिवस आधी पोहोचेल. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख १ जून आहे. या हिशेबाने अंदमानमध्ये मान्सून १८ मेपर्यंत पोहोचेल. तथापि, हवामान विभागाने मान्सून लवकर येण्याची घोषणा केलेली नाही, पण अभ्यासकांच्या मते त्याची शक्यता जास्त आहे.
बांसवाडात ४७.२ अंश तापमान
जयपूर | राजस्थानात सोमवारी सर्वाधिक ४७.२ अंश सेल्सियस तापमान बांसवाडात नोंदले गेले. त्याआधी १ मे रोजी ४७.१ अंश तापमान बिकानेरमध्ये नोंदले गेले.

मध्य प्रदेशच्या ५ जिल्ह्यांत उष्णतेची लाट
भोपाळ | मध्य प्रदेशच्या पाच जिल्ह्यांत उष्णतेची लाट असून राज्यात रतलाममध्ये सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...