आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुरी मार्गे धावणार:वाहतूक काेंडीमुळे नांदेड-जम्मू तावी एक्स्प्रेसच्या मार्गात तात्पुरता बदल

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतूक काेंडीमुळे नांदेड-जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेसच्या मार्गात ६ जानेवारीला तात्पुरता बदल करण्यात आला आहे. ही गाडी नवी दिल्ली, जाखल आणि धुरी या बदलेल्या मार्गाने धावेल.

यामुळे ती अंबाला, राजपुरा आणि पतियाळा रेल्वेस्थानकांवरून धावणार नाही. २० जानेवारीला ही गाडी पानिपत, जाखल, धुरी आणि लुधियाना या बदललेल्या मार्गाने धावेल. यामुळे ही गाडी अंबाला, राजपुरा आणि पतियाळा या रेल्वेस्थानकांवरून धावणार नाही. १५ आणि २२ जानेवारीला जम्मू तावी येथून सुटणाऱ्या जम्मू तावी-नांदेड हमसफर एक्स्प्रेसच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. ही गाडी लुधियाना, धुरी, जाखल आणि पानिपत या बदललेल्या मार्गाने धावेल.

बातम्या आणखी आहेत...