आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निवळले असून सूर्य चांगलाच तळपू लागला आहे. सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर येत असल्याने दोन दिवसांपासून कमाल तापमान यंदाच्या मोसमात प्रथमच ४१.४ अंश सेल्सियस या उच्चांकी पातळीवर गेल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे.
गेल्या वर्षी ८ ते १० एप्रिलदरम्यान पारा ४१ अंश आणि १ मे रोजी ४१.४ अंशांवर गेल्याची नोंद झाली होती. दुपारच्या सत्रात उन्हाच्या तीव्र झळांनी अंग पोळून निघत असून जीव कासावीस होतो. यामुळे दुपारी बाजारपेठेतील गर्दी घटली असून वाहतुकीवरही उन्हाचा परिणाम झाला आहे.
हवामान बदलामुळे ८ मेपर्यंत ढगाळ वातावरण आणि पोषक वातावरण असलेल्या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडला. यामुळे दिवसाचे व रात्रीचे तापमान घसरले होते. ९ मेपासून आकाश निरभ्र आहे. सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पडतात. त्याचबरोबर उष्ण वारे वाहून येत आहेत. त्यामुळे कमाल तापमान सलग दोन दिवस उच्चांक पातळीवर गेल्याची नोंद झाली. सरासरीपेक्षा ते दोन अंशांनी तापमान जास्त राहिले आहे. रात्रीच्या तापमानात उलट स्थिती असून दिवसभरातील उष्णता उत्तरी थंड वारे खेचून आणत असल्यान सरासरीच्या तुलनेत ३ अंशांनी पारा घसरून तापमान २२ अंशावर गेले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.