आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:लग्नाच्या दहा दिवसांनी तरुणीने नकार देताच तरुणाची पोलिस ठाण्याच्या इमारतीवरून उडी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरातून पळून जाऊन दोघांनी रीतिरिवाजाप्रमाणे लग्नदेखील केले, पण आई-वडिलांनी मुलीचा विचार बदलला अन्...

औरंगाबादच्या हुसेन कॉलनी येथील तौफिक शेख अहमद शेख (२१) याने विशालनगर येथील एका तरुणीसाेबत दहा दिवसांपूर्वी पळून जाऊन लग्न केले हाेते. बुधवारी रात्री आठ वाजता हे दाेघे पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिस जबाब नोंदवून घेत हाेते. तेव्हा अचानक ताैफिकने पोलिस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात त्याच्या कमरेला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गारखेड्यातील विशालनगर भागातील २३ वर्षीय तरुणी व तौफिक लग्न करण्यासाठी पळून गेले हाेते. दाेघांनी रीतिरिवाजाप्रमाणे लग्नदेखील केले. मात्र दहा दिवसांनंतर कुठे जायचे, असा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा कुणीतरी या दोघांना पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ताैफिक आणि तरुणी बुधवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तरुणी विशालनगरातील असल्याचे कळले. ही माहिती पुंडलिकनगर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी या दोघांना आणण्यासाठी गाडी पाठवली आणि मुलगी सापडल्याची माहिती आई-वडिलांना दिली. तिच्या आई-वडिलांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवण्यास सुरुवात केली.

आई-वडिलांनी मुलीचा विचार बदलला अन्...

मुलगी घरातून पळून गेल्यानंतर आई-वडिलांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. ती परत येताच त्यांनी पोलिस ठाण्यातच तिची समजूत घालण्यास सुरुवात केली. शिवाय प्रेमविवाह केल्यानंतर दहा दिवस ती घराबाहेर राहिली होती. या सगळ्या अनुभवानंतर भावनिक झालेल्या मुलीने ताैफिकसोबत जाण्यास नकार दिला. हे ऐकताच त्याने उडी मारली.

बातम्या आणखी आहेत...