आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढरं सोनं:सिल्लोडमध्ये कापसाला दहा हजार रुपयांचा भाव, कापूस पिकाचे फरदड घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल

सिल्लोड / रविंद्र सोनवणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कापसाला चार जानेवारी रोजी सिल्लोड तालुक्यात किरकोळ व्यापाऱ्यांकडून दहा हजार रुपयांचा भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.मात्र यामुळे सिल्लोड तालुक्यात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे फरदड घेण्याकडे कल वाढला आहे.

दरवर्षी सिल्लोड तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पन्न घेतो. तालुक्यातील कापसाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे दिवसेंदिवस कापूस उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वाढ होत आहे. यंदा तालुक्यात ३९ हजार हेक्टर शेती क्षेत्रात कापूस लागवड करण्यात आली होती.ती गतवर्षीच्या तुलनेत ८०० हेक्टर जास्त आहे. सुरुवातीला वेळोवेळी पडलेला पाऊस शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न मिळवून देईल असे वाटत असतानाच सप्टेंबरच्या मध्यात अतिवृष्टी झाल्यामुळे कापसाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले यामुळे दहा क्विंटल कापसाची शक्यता असणाऱ्या शेतकऱ्यांना अवघा दोन ते तीन क्विंटल कापसाचे उत्पन्न मिळाले परिणामी तालुक्यात कापसाचे उत्पन्न घटले त्यामुळे आता शेतकऱ्यांचा कापुस कमी प्रमाणात शिल्लक राहिला आहे. आणि कापसाचा भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे फरदड घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या उभ्या असलेल्या कापसाच्या पिकाला एक किंवा दोन पाणी दिल्यानंतर तीन-चार क्विंटल कापसाचे उत्पन्न मिळाले तरी शेतकऱ्याला परवडते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण आता कपाशी उपटून त्याजागी बाजरी सोयाबीन किंवा इतर कुठलेही पीक घ्यायचे तर खर्चही निघेल की नाही अशी शंका शेतकऱ्याला असल्यामुळे शेतकरी फरदड घेण्यासाठी उत्सुक दिसत आहे.

कापसाचे वाढलेले भाव लक्षात घेऊन मी फरदड घेण्याचे ठरवले असून माझ्या शेतात इतर पीक घेण्यास गेलो तर परवडणार नाही म्हणून माझा निर्णय फरदड घेण्याचा झाला आहे. - दादाराव खेळवणे शेतकरी मंगरुळ, तालुका सिल्लोड

तालुक्यात कापसाचे उत्पन्न घटल्यामुळे आज कापसाचे भाव वाढले आहेत याला दुसरे कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेतही कापूस गाठींची मागणी वाढली आहे. : विजय कोरडे आडत व्यापारी मंगरुळ ,तालुका सिल्लोड.

बातम्या आणखी आहेत...