आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:दादरा नगरहवेली मधून दहा कामगार पांगरा शिंदे येथे सुखरूप परतले

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • खासदार ॲड. राजीव सातव यांच्यासह आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा पुढाकार

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे व परिसरातील  मागील तीन वर्षापासून दादरा नगर हवेली येथे कामाला असलेले दहा कामगार निसर्ग चक्रीवादळ व कोरोनाच्या तडाख्यातून बुधवारी (ता. ३) रात्री सुखरुप गावी परतले.  खासदार ॲड. राजीव सातव तसेच आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या पुढाकारातून गावी पोहोचताच कामगारांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले होते.

हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कामगार बाहेर जिल्हयात तसेच बाहेर राज्यात कामाला गेले आहेत. त्या ठिकाणी लहान मोठ्या कंपन्यांमध्ये काम करून हे कामगार उदरनिर्वाह करतात. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील दहा आदिवासी कामगार मागील तीन वर्षापासून दादरा नगरहवेलीच्या एका पाईपच्या कारखान्यात कामाला होते. मात्र कोरोना विषाणूमुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आल्याने या कामगारांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीत गावी आणणे आवश्‍यक होते. त्यातच निसर्ग चक्रीवादळाची भितीही त्यांना भेडसावत होती.

सदर प्रकार कळाल्यानंतर आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी खासदार ॲड. राजीव सातव यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्या कामगारांना आणण्याठी मागील तीन दिवसांपासून प्रक्रिया सुरु झाली. दादरा नगरहवेली भागातून त्यांना गावी परतण्याची परवानगी खासदार ॲड. सातव यांनी काढून दिली. त्यानंतर प्रकल्पाधिकारी डॉ. राठोड यांनी वाहनाची व्यवस्था करून त्या दहा कामगारांना बुधवारी  सुखरूप गावी परत आणले. बुधावारी रात्री उशीरा गावी परतलेल्या मजूरांनी सुटकेचा निःश्‍वास सोडत खासदार ॲड. सातव व आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे आभार व्यक्त केले.

0