आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकामावर गेलेल्या आईकडे सोडतो म्हणत १६ वर्षीय मुलीला म्हैसमाळ येथे नेऊन बलात्कार करणारा नराधम रवी आसाराम दराडे (३३, मिटमिटा गाव) याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली चार हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी ठोठावली.
प्रकरणात १६ वर्षीय पीडितेच्या आईने फिर्याद दिली. फिर्यादी व त्यांचे पती मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १३ जुलै २०२१ रोजी फिर्यादी कामानिमित्त पडेगावात आली होती. तेव्हा पीडिता एकटी घरी होती. नंतर ती आईकडे जाण्यासाठी निघाली तेव्हा तारांगणजवळील रोडवर आरोपी रवी दराडे याने तुला आईकडे सोडतो, अशी थाप मारत दुचाकीवर बसवून म्हैसमाळला नेले. तेथे एका खोलीत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला सिल्लोडला नेले. पीडिता औरंगाबादला आल्यानंतर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. नंतर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात तपास अधिकारी एम. व्ही. हिवराळे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागूल यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात पीडिता आणि फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी रवी दराडे याला दोषी ठरवून भादंवि कलम ३६३, ३६६ (अ) अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड, पोक्सोचे कलम ४ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. गुन्ह्यातील इतर आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपींच्या वतीने अॅड. प्रकाश उंटवाल, अॅड. दारुंटे यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.