आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिक:एसटी आगारातील 16 आस्थापना भाड्याने देण्यासाठी निविदा ; 16 नोव्हेंबर अंतिम तारीख

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद विभागातील विविध तालुके तसेच शहरातील बसस्थानकांसह १६ व्यावसायिक आस्थापनांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. निविदा भरण्याची अंतिम तारीख १६ नोव्हेंबरपर्यंत आहे.औरंगाबाद विभागातील एसटी महामंडळाच्या विविध आस्थापनांतून महामंडळाला वर्षाला अतिरिक्त उत्पन्न मिळते. यात कॅन्टीन, पार्किंग विविध स्टॉलचा समावेश आहे. त्याअंतर्गत या वर्षी गंगापूर, सिल्लोड, कन्नड, पाचोड, शहागंज, शिऊर, फुलंब्री, खुलताबाद, लासूर स्टेशन, देवगाव रंगारी आदी आगारांतील १६ बसस्थानकांतील आस्थापनांच्या निविदा काढण्यात आल्या आहे. यात कॅन्टीन, फुल स्टॉल, ई-महा सेवा केंद्र, पुस्तकांचे दुकान, फळांचे दुकान आदींचा समावेश आहे. उपाहारगृहासाठी ११८० जीएसटीसह व इतर स्टॉलसाठी ५९० रुपये जीएसटीसह विनापरतावा फॉर्म भरून देणे आहे. याविषयी माहितीसाठी शहरातील एसटी विभागीय कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...