आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजीप्राकडून प्रक्रिया:जुन्या योजनेच्या जलवाहिनीची 193 कोटींची निविदा प्रसिद्ध

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जुन्या योजनेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान मंजूर केलेल्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीसाठी १९३ कोटी रुपयांची निविदा १२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने प्रसिद्ध केली. अल्प मुदतीची ही निविदा चार पॅकेजमध्ये काढण्यात आली असून २० डिसेंबर रोजी निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे, अशी माहिती मजीप्राचे कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांनी दिली.

नवीन पाणीपुरवठा योजनेचा समावेश केंद्राच्या अमृत-२ योजनेमध्ये झाला आहे. त्यामुळे ती २,७४० कोटींवर पोहोचली आहे. योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हाेणार आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने जीर्ण झालेल्या दोन्ही योजनांचे बळकटीकरण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केंद्रेकर यांनी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याकरिता १९३ कोटी रुपयाचा आराखडा तयार करून सादर केला होता. या आराखड्यास राज्य शासनाने मंजुरी दिली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत निविदा काढण्यास परवानगी देण्यात आली. मजीप्राचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांनी १९३ कोटी रुपयांतून ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी अल्पमुदतीची निविदा सोमवारी प्रसिद्ध केली. जलवाहिनी टाकण्यासाठी चार महिने, फारोळा येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी ९ महिन्यांची मुदत आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाणीपुरवठा बैठकीत शहराचा पाणीपुरवठा तीन व सहा दिवसांआड करण्याचा आढावा घेतला.

डोंगरावर बांधणार जलकुंभ फारोळा येथे २४ एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे. त्याकरिता पंपिंग मशिनरी लागणार असून ती खरेदीसाठी पाचव्या टप्प्याची निविदा दोन दिवसांत प्रसिद्ध केली जाणार आहे. यामध्ये ३५ लाख लिटर क्षमतेचे संतुलित जलकुंभ नक्षत्रवाडी येथे उंच डोंगरावर बांधण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...