आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती:देवगिरी साखर कारखान्याच्या भाडे तत्वावरील निविदा प्रक्रियेला पुढील सुनावणी पर्यंत अंतरिम स्थागिती

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद देवगिरी सहकारी साखर कारखाना फुलंब्रीच्या भाडे तत्वावर देण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या निविदा प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संदीपकुमार सी. मोरे (सुटीकालिन ) यांनी पुढील सुनावणी पर्यंत अंतरिम स्थागिती दिली आहे.

देवगिरी सहकारी साखर कारखान्यावर जुलै 2015 ला संचालक मंडळ निवडून आले व काँग्रेसचे जगन्नाथ काळे यांची कारखान्याच्या चेअरमन पदी नेमणूक करण्यात आली . त्यानंतर 7 डिसेंबर 2016ला कारखान्यावर अवसायकची नेमणूक केली . कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक चे कर्ज होते व त्या संदर्भात सहकार न्यायालयामध्ये बँकेतर्फे प्रकरण दाखल केलेले आहे . राज्य सहकारी बँकेने 5 मे 2022 रोजी देवगिरी साखर कारखाना भाड्याने देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. सदरील निविदा सूचनेला व निविदा प्रक्रियेला कारखान्याचे सभासद संदीपान सर्जेराव पवार व इतर यांनी ऍड. प्रसाद जरारे यांच्या वतीने व बाबुराव अपीचंद काळे व इतर यांनी ऍड. अश्विन होन यांच्या वतीने रिट याचिका दाखल करून आव्हान दिले होते.

देवगिरी सहकारी साखर कारखान्याने डी आर टी न्यायालयांमध्ये सुमारे 41 कोटी रुपये जमा केलेले आहे व कारखाण्याच्या वतीने एक रकमी कर्ज परत फेड करण्याचा प्रस्ताव देखील बँकेला वेळोवेळी दिलेला आहे आणि म्हणून कारखाना विकण्याची अथवा भाड्यावर देण्याची कोणतीही आवश्यकता नाही असे याचिकाकर्त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच यापूर्वी देखील कारखान्याचा जमीन विक्री संदर्भातील निविदा प्रक्रियेला स्थागिती दिलेली आहे. कारखान्याचे सर्व साधारण सभासद व ऊस उत्पादक यांचा विचार करता बँकेने देवगिरी सहकारी साखर कारखाना भाड्याने देण्यासाठी निविदा प्रक्रियेला देखील स्थागिती द्यावी अशी विनंती केली. बँकेने प्रसिद्ध केलेल्या निविदा सूचनेमध्ये निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख 03 जून 2022 व निविदा उघडण्याची तारीख 04 जून 2022 दिलेली होती आणि त्यानुषंगाने उच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम स्थागिती आदेशामध्ये निविदा प्रक्रिया पार पाडावी परंतु अंतिम पत्र देण्यात येऊ नये असे आदेशित केले व पुढील सुनावणी दिनांक 09 जून 2022 रोजी ठेण्यात आलेली आहे.

कारखाना सुरू करणे शक्य होईल - काळे

राज्य सहकारी बँक आणि बडोदा बँक यांनी थकीत कर्जावरील व्याज माफ केले तर कारखाना सुरू करणे शक्य होईल.कारखान्याची चाळीस कोटीची देणे असून व्याज माफ झाल्यास 20 ते 22 कोटी देणे लागते. असे जगन्नाथ काळे माजी चेअरमन देवगिरी साखर कारखाना फुलंब्री यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...