आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळुच्या निवीदा प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामध्ये आठ तारखेला या निवीदा उघडणार आहेत. त्यामुळे आगामी आठवड्या भरात वाळुच्या टेंडर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर या महिन्यातच वाळुच्या डेपोच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.त्यासाठी गौणखनिज विभागाच्या वतीने तयारी करण्यात येत आहे.जिल्ह्यात सात ठिकाणी हे डेपो होणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ वाळुघाट आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यात वेगवेगळे वाळुचे डेपो तयार करण्यात आले आहेत. यामाध्यमातून नागरिकांना वाळुचा पुरवठा करण्यात येणार आहे. सध्या वाळुचे लिलाव बंद असल्यामुळे महागड्या दराने सामान्य माणसाला वाळु खरेदी करावी लागत आहे.
दहा जूनपुर्वीच करावा लागणार वाळुचा उपसा
१० जुन ते ३० सप्टेबर हा पावसाळ्याचा कालावधी असतो.या कालावधीमध्ये वाळु उत्खननाला परवानगी नसते. त्यामुळे त्यापुर्वीच वाळुचे उत्खनन करण्याच्या सुचना निवीदा धारकाला देण्यात येणार आहे.त्यामुळे टेंडर निघाल्यानंतर ज्याला टेंडर मिळेल त्याचा देखील तातडीने डेपो सुरु करण्यासाठी तातडीने वाळु उत्खनन करुन वाळु डेपो सुरु करण्यासाठी प्रयत्न असणार आहे.
अशी असणार निविदा प्रक्रिया
याबाबत जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी सांगितले की,या निवीदा प्रक्रियेमध्ये २८ तारखेला निवीदा प्रसिद्ध झाली आहे. पाच तारखेला दुपारी तीन वाजेपर्यत निवीदा भरण्याचा अंतिम वेळ आहे.तर आठ तारखेला दुपारी तीन वाजता निवीदा उघडण्यात येणार आहेत. यामध्ये निवीदा भरणाऱ्याला दहा लाख रुपये डीपॉझीट भरावे लागणार आहे.
तसेच त्याने वर्षभरात २५ लाख रुपयांचा व्यवहार केलेला असावा. तसेच गेल्या तीन वर्षातले आर्थीक विवरण पत्र तसेच जीएसटी रजीस्ट्रेशन केलेले असले पाहिजे या अटी निवीदा धारकांसाठी असणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.