आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल योजनेची प्रक्रिया नव्याने सुरू:6200 घरे बांधण्यासाठी पाच एप्रिलपर्यंत स्वीकारणार निविदा

छत्रपती संभाजीनगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने घरकुल योजनेची निविदा प्रक्रिया नव्याने सुरू केली आहे. आता ४० हजार घरांऐवजी ६,२०० घरे बांधली जातील. त्यासाठी १३ मार्च रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ५ एप्रिलपर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार आहेत.

तिसगाव-१, तिसगाव-२, सुंदरवाडी आणि पडेगाव येथील प्रकल्पांसाठी चार निविदा प्रसिद्ध केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. २०१६ पासून चर्चेत असलेला हा प्रकल्प सुरुवातीला १२८ हेक्टरमध्ये उभारला जाणार होता. मंजूर डीपीआरप्रमाणे ४० हजार घरांचा प्रकल्प होता. या कामाची निविदा प्रक्रिया राबवून समरथ कन्स्ट्रक्शनला कंत्राट दिले हाेते. मात्र, बँक गॅरंटी भरण्यास कंत्राटदाराने टाळाटाळ केली. दरम्यान, निविदा प्रक्रियेविषयी लोकप्रतिनिधींनी राज्य व केंद्र सरकारकडे तक्रार केल्यानंतर समितीकडून चाैकशी झाली. समितीने हर्सूल, पडेगाव, तिसगाव आणि सुंदरवाडीत जागा योग्य नसल्याचा अहवाल दिला. त्यानंतर मुंबईतील बैठकीत निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. नंतर या प्रकरणात कंत्राटदारांनी साखळी करून एकाच आयपी अ‍ॅड्रेसवरून निविदा प्रसिद्ध केल्याचेही चौकशीतून समोर आले. प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. समरथ कन्स्ट्रक्शनसह विविध कंपन्यांच्या १९ संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

२४.४९ हेक्टरवर बांधकाम : पालिकेने सर्व पडताळणी करून ६,२०० घरकुलांच्या प्रकल्पासाठी सोमवारी निविदा प्रसिद्ध केल्या. तिसगाव-१, तिसगाव-२, सुंदरवाडी व पडेगाव या चार जागांवर २४.४९ हेक्टरवर घरांचे बांधकाम केले जाईल. ५ एप्रिलपर्यंत या निविदा स्वीकारल्या जातील.

बातम्या आणखी आहेत...