आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:दहावीचा विद्यार्थी अचानक बेपत्ता; बारा तासांनंतर घरी कॉल करून म्हणाला, माझे अपहरण झाले

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खडकेश्वर येथील १६ वर्षांचा मुलगा बुधवारी अचानक बेपत्ता झाला. काही वेळातच त्याने काॅल करून अपहरण झाल्याचे सांगितल्याने कुटुंबासह क्रांती चौक पोलिसांची धांदल उडाली. मात्र, बारा तासांनंतर मुलाने मी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने नातेवाइकांनी त्याला करमाळा पोलिसांशी संपर्क साधला व त्याच्या वडिलांनी रात्रीतून सुखरूप परत आणले.

सुनील (नाव बदललेले आहे) हा दहावीचे शिक्षण घेतो. बुधवारी सकाळी वह्या, पुस्तके घेऊन तो घराबाहेर पडला. मात्र, बराच वेळ होऊनही परतला नाही. त्यामुळे कुटुंबाने शाेधाशाेध केली. रात्री ८ वाजता क्रांती चौक पोलिसांकडे तक्रार केली. तेवढ्यात एका अनोळखी क्रमांकावरून सुनीलने कॉल केला. मी करमाळा येथे असून अपहरण झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुनीलचे अपहरण झाल्याची तक्रार गुरुवारी दिवसभर त्याच्या कुटुंबीयांनी दिली नाही. अभ्यासाच्या तणावातून त्याने हा प्रकार केल्याचा अंदाज अाहे. १५ दिवसांपूर्वी त्याला मामाकडून घरी आणले होते. त्याचे असाइनमेंटदेखील बाकी होते. तरीही जेथून अपहरण झाल्याचे सांगत आहे त्या समर्थनगरातील फूटेज पाेलिस तपासणार आहेत.

म्हणे.... व्हॅन पैशाने भरली होती, त्यातून ४ हजार घेतले
सुनीलने सांगितल्यानुसार, समर्थनगरातून व्हॅनमध्ये आलेल्या लाेकांनी त्याचे अपहरण करून करमाळात नेले. माझ्या दोन्ही बाजूंनी दोन व्यक्ती तर समोर चालक होता. व्हॅन संपूर्ण पैशांनी भरलेली होती. करमाळा येथे एक जण लघुशंकेसाठी उतरल्यानंतर मी व्हॅनमधून चार हजार रुपये घेतले. एकाच्या डोक्यात रॉड मारला व बाहेर पडून स्थानिकांकडे धाव घेतली. हे पाहून अपहरणकर्ते निघून गेले. क्रांती चौक पोलिसांनी करमाळा पोलिसांशी संपर्क साधला. निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी तत्काळ दोन कर्मचाऱ्यांना करमाळ्याकडे रवाना केले व गुरुवारी सुनील सुखरूप परतला.

बातम्या आणखी आहेत...