आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी-बारावी परीक्षा:दहावी-बारावी परीक्षेत विषय शिक्षकांना केंद्र परिसरात वावरण्यास बंदी, परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यमंडळाचा निर्णय

प्रतिनिधी । औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेत यंदा शाळा तेथे परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने कडक नियमावली केली आहे. परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या दिवशी विषय शिक्षकांना बंदी घालण्यात आली आहे. पेपरमध्ये विषय शिक्षकांद्वारे कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

गतवर्षी कोरोनामुळे राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणदान करुन निकाल जाहीर केला. यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा तेथे परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्यात आले आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना 14 फेबु्रवारीपासून सुरूवात झाली आहे. तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा उद्या शुक्रवार दि. 25 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे.

बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान, दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान होणार आहे. यंदा शाळा तिथे परीक्षा केंद्र दिल्याने पूर्वी केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना मुख्य परीक्षा केंद्र तर नव्याने केंद्र दिलेल्या शाळा, महाविद्यालयांना उपकेंद्र असे संबोधण्यात येणार आहे. मुख्य तसेच उप केंद्राचे कामकाज पाहणारे केंद्रसंचालक हे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य राहतील. 15 पेक्षा कमी आवेदनपत्र भरलेल्या शाळा या मुख्य केंद्रास जोडण्यात आलेल्या आहेत.

परीरक्षक कार्यालयातून मुख्य परीक्षा केंद्रास प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठी सहाय्यक परीरक्षक राहतील. मुख्य केंद्राकडून उपकेंद्राकडे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठी संबंधित उपकेंद्राचे शिक्षक (रनर) असणार आहे़. दरम्यान, परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी ज्या विषयांचा पेपर असेल त्या विषयांच्या शिक्षकांना शाळा, परीक्षा केंद्रांवर बंदी घालण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे़. त्या दिवशी संबंधित शिक्षकांना परीक्षेचे काम देऊ नये अशा स्पष्ट सूचना मुख्याध्यापकांना मंडळाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...