आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिक्रिया:टेस्ला कंपनी महाराष्ट्रतच गुंतवणूक करणार, कर्नाटकात टेस्ला गेली नाही- सुभाष देसाई

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 8 जानेवारीला टेस्लाने भारतात कंपनीची नोंदणी केली आहे

इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी 'टेस्ला' कर्नाटकमध्ये गेल्याच्या चर्चा चुकीच्या असल्याची माहिती औरंगाबादचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. टेस्ला कंपनी महाराष्ट्र मध्येच गुंतवणूक करणार आहे. त्याबाबत कंपनीशी चर्चाही झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

टेस्लाने 8 जानेवारीला भारतामध्ये आपल्या कंपनीची नोंदणी केली होती. यासाठी त्यांनी बंगळुरुमधील रिचमंड सर्कल जंक्शन भागात कंपनीचे ऑफिस सुरू करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी टेस्लाचे कर्नाटकात स्वागत केले. यानंतर टेस्लाने महाराष्ट्राऐवजी कर्नाटकात कंपनी सुरू केल्याच्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी सुभाष देसाई औरंगाबादमध्ये आले होते. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना देसाई म्हणाले की, टेस्ला कंपनीचे बंगळुरूमधून मधून केवळ विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र या गुंतवणूकीबाबत आशावादी असल्याचे त्यांनी सांगितले.

'टेस्ला'ची बंगळुरूला पसंती ?

अमेरिकन कार कंपनी टेस्लाने आपल्या भारतातील पहिल्या ऑफीससाठी बंगळुरुची निवड केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. टेस्लाने 8 जानेवारी रोजी भारतामध्ये आपल्या कंपनीची नोंदणीदेखील केली आहे. टेस्ला कंपनीने बंगळुरुमधील रिचमंड सर्कल जंक्शन भागात टेस्ला कंपनीचे ऑफिस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच ठिकाणी कंपनीचे संशोधन आणि विकास ऑफिसदेखील असेल. 'टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी' असे भारतातील कंपनीला नाव देण्यात आले आहे.