आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:टीईटी परीक्षा घोटाळ्यानंतर शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची होणार पडताळणी

प्रतिनिधी । औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकणात अटक झाल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. गैरप्रकार करुन टीईटी परीक्षा उत्तीर्ण होवून अनेक उमेदवारांनी नियुक्ती, पदस्थापना मिळवल्याचा संशय आहे. त्याअनुषंगाने परीक्षा परीषदेने 13 फेब्रुवारी 2013 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

13 फेब्रुवारी 2013 नंतर औरंगाबाद जिल्ह्यात खासगी अनुदानित शाळांमध्ये 360 उमेदवारांची;तर जिल्हा परीषदेच्या शाळांमध्ये 200 उमेदवारांची नियुक्ती, पदस्थापना झाली आहे. या सर्व उमेदवारांचे टीईटी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्याअनुषंगाने औरंगाबाद जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागात मुख्याध्यापक, शिक्षकांकडून टीईटी प्रमाणपत्राची सत्यप्रत जमा करण्यासाठी गर्दी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...