आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वाची बातमी:शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पुढे ढकलली; आता 31 ऑक्टोबरला होणार परीक्षा, सुधारित वेळापत्रक जाहीर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर परीक्षा परिषदेने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुर्ण झाली. ही परीक्षा १० ऑक्टोंबर रोजी घेण्यात येणार होती. मात्र शासनाने ही परीक्षा पुढे ढकलली असून ३१ ऑक्टोंबर रोजी परीक्षा होणार असल्याचे पत्रकाद्वारे परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

शिक्षक पदासाठी टीईटी बंधनकारक असल्याने २०१३ पासून राज्यात परीक्षा घेतली जाते. करोना पार्श्वभूमीवर २०१९ पासून परीक्षेचे नियोजन राज्य परीक्षा परिषदेला करता आलेले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव काहिसा कमी झाल्याने परिषदेने याबाबत सरकारकडे विचारणा केली होती. परीक्षा घेण्यास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली. त्यानंतर परिषदेने वेळापत्रक जाहीर केले. प्राथमिक (शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-१) व माध्यमिक स्तरावर (शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-२) परीक्षा घेतली जाते.

असे आहे बदल झालेले वेळापत्रक -
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे - १४ ते ३१ ऑक्टोंबर
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ - ३१ ऑक्टोबर, सकाळी १०:३० ते दुपारी १
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ - ३१ ऑक्टोबर, दुपारी २ ते सायंकाळी ४:३०

बातम्या आणखी आहेत...