आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभागृहात उपस्थित केला मुद्दा:माझ्या मुलीच्या विरोधात खोटी बातमी देणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी -रमेश बोरनारे

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या मुलीच्या विरोधात खोट्या बातम्या देणाऱ्या माध्यमाच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. तसेच माध्यमांना अशा प्रकारची माहिती देणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यता यावा अशी मागणी आमदार रमेश बोरनारे यांनी विधीमंडळात केली आहे. टीईटी घोटाळाप्रकरणी कथितरित्या शिंदे गटातील आमदार रमेश बोरनारे यांच्या मुलीचे नाव समोर आल्याच्या बातम्या काही माध्यमांत आल्या होत्या.

परंतु, हे वृत्त खोटे निघाले. याबाबत दिव्य मराठीने बोरनारे कुटुंबीयांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांनीही या वृत्ताचे खंडन केले. सोबतच अशा खोट्या बातम्या देणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर पाऊल उचलण्याचा इशारा दिला. यानंतर आमदार बोरनारे यांनी सभागृहात घडलेला प्रकार सांगितला.

सभागृहात बोलताना आमदार बोरनारे म्हणाले, की एका माध्यमावर माझ्या मुलीने बोगस टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवली असे खोटे वृत्त प्रसारित केले. माझ्या मुलीने टीईटीची परीक्षाच दिली नाही. माझ्या एका मुलीचे लग्न झालेले आहे. दुसरी मुलगी बीई करत आहे. परंतु, हे संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळे वळण देऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन. ज्यांनी माध्यमांना ही माहिती पुरवली असेल त्यावरती आपण गुन्हे नोंद करण्याचे संकेत द्यावे अशी विनंती त्यांनी यावेळी बोलताना केली.

बातम्या आणखी आहेत...