आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएमची ऑफर:मुस्लिम आरक्षण मिळवण्यासाठी खासदार इम्तियाज जलिल यांनी सरकारला दिली ऑफर, म्हणाले आरक्षण दिले तर महापालिका निवडणुका लढणार नाही

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एमआयएम नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला दिसत आहेत. जलिल यांनी यासंदर्भात नुकतीच मुंबईमध्ये सभा घेतली होती. आज त्यांनी पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा मुस्लिम आरक्षणाची मागणी केली आहे. दरम्यान त्यांनी राज्य सरकारला या आरक्षणाच्या बदल्यात ऑफरही दिली आहे. यामुळे त्यांच्या या ऑफरची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.

...तर महापालिका निवडणुका लढणार नाही

औरंगाबादेतील महापालिकेच्या निवडणुका या तोंडावर आल्या आहेत. या दरम्यान मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. हा मुद्दा धरुनच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनी राज्य सरकारला एक ऑफर दिली आहे. सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले तर आम्ही राज्यभरात कोणत्याही ठिकाणी महापालिका निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा जलिल यांनी केली आहे. आता या घोषणेचा परिणाम राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर कसा पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

खासदार जलिल यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला आरक्षण दिले जावे अशी मागणी त्यांनी यामधून केली आहे. तसेच महाराष्ट्रातील वक्फ मालमत्तेचे संरक्षण व महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाला विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून प्रलंबित मागण्या सोडवण्यात याव्या अशी मागणी देखील या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

जलिल यांनी पत्रातून केल्या आहेत या मागण्या

  • मुस्लिम समाजाला त्वरीत 5 टक्के आरक्षण
  • मराठा आरक्षणाच्या धर्तीवर मुस्लिम समाजाच्या सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरीसाठी विधानसभेत त्वरीत कायदा मंजूर केला जावा
  • मुस्लिम समाजाच्या विकासासाठी दरवर्षी शंभर कोटींची आर्थिक तरतूद करण्यात यावी
  • वक्फ मंडळाला अद्ययावत करण्यासाठी दरवर्षी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी
बातम्या आणखी आहेत...