आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर:ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ठाकरे सेनेची ग्रामीण भागात संवाद मोहीम

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात संवाद दौरा सुरु केला आहे. सहसंपर्क प्रमुख अॅड. आसाराम रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सहा गावांत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा दमदार वाटचाल करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना व जनतेला करण्यात आले. पानवी ,माळीघोगरगाव, अव्वलगाव, हमरापूर,वांजरगाव, सावखेडगंगा येथील शिवसैनिक, कार्यकर्ते व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. माजी सभापती अविनाश गलांडे, तालुकाप्रमुख सचिन वाणी, संजय निकम, उपतालुकाप्रमुख रमेश सावंत आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...