आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे सभा:ठाकरेंच्या सभेला ‘स्वाभिमानी’नाव;गर्दीसाठी दीड हजारावर बैठकांचे सत्र ; 30 हजार खुर्च्यांची ऑर्डर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘भोंगा सभा’, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जलआक्रोश मोर्चा’ला उत्तर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होत आहे. त्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू आहे. आमदार अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व सर्वच प्रमुख नेते तयारीत व्यग्र आहेत. गुरुवारपासून पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकांनीही वेग घेतला आहे. शुकवारी दानवेंसोबत प्रमुख अधिकाऱ्यांनी चर्चा केली. दरम्यान, या सभेचे ‘स्वाभिमानी सभा’ असे मुंबईतून नामकरण करण्यात आले आहे. शुक्रवारी पदाधिकाऱ्यांना तसे ई-मेल प्राप्त झाले आहेत. राज ठाकरेंच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी २ मे रोजी आमदार दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पोलिस आयुक्तांकडे अर्ज केला. म्हणजे त्याच वेळी सभेचे नियोजन ठरले होतेे. त्यानंतर १४ मे रोजी मुंबईत उद्धव ठाकरेंची सभा झाली. त्याची जाहिरातबाजी ‘खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार’ अशी करण्यात आली होती. आता औरंगाबादच्या सभेचे ‘स्वाभिमानी सभा’ असे नामकरण करण्यात आले आहे. ही शिवसेनेची सभा आहे. त्यात केवळ औरंगाबादचे स्थानिक विषय, पाणीप्रश्नाचा संबंध नाही. मुख्यमंत्री एकूणच राज्याच्या अनुषंगाने भूमिका जाहीर करतील, असे आमदार दानवे म्हणाले.

{ ५ जून रोजी शिवसेनेचे प्रमुख नेते अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन सभेच्या कार्यक्रमाची घाेषणा करतील. { मात्र त्यापूर्वी शिवसेनेने सभेच्या तयारीसाठी सर्व शक्ती कामाला लावली आहे. या सभेत मुख्यमंत्र्यांसाेबत पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, खासदार संजय राऊत येऊ शकतात. आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मात्र अद्याप निश्चिती नाही. { सभेच्या तयारीसाठी २७ मे ५ जूनपर्यंत जिल्ह्यात दीड हजार बैठका घेण्याचे नियोजन शिवसेनेने केले आहे. खैरे, दानवेंसह प्रमुख पदाधिकारी या बैठका घेत आहेत. जिल्ह्यातील २७०० बूथवरून प्रत्येकी २५ नागरिक आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. एकूण दीड लाखांवर गर्दी जमवण्याचे पक्षाने ठरवले आहे. यापैकी २५ टक्के महिला असतील. { सभेसाठी ३ हजार वाहने शहरात येतील. त्या दृष्टीने पोलिसांनीही नियोजन सुरू केले आहे. { सभेचे व्यासपीठ १०० फुटांचे, त्यासमोर डी (सुरक्षा कडी) ४५ फुटांचा असेल. सभेदरम्यान तो पूर्णपणे रिकामा असेल. { साउंड सिस्टिमचे कंत्राट मुंबईतील ‘ठाकरे स्पेशालिस्ट’ कंपनीला देण्यात आले आहे.

संभाजीनगरला हवा देणार सभेच्या प्रचारासाठी ५ टीझर तयार करण्यात आले आहेत. ते चार टप्प्याने सोशल मीडियावर व्हायरल केले जातील. ‘संभाजीनगर’ नामांतराचा मुद्दाही चर्चेत येण्याची शक्यता आहे. मुंबईच्या सभेत उद्धव ठाकरेंनी ‘मी सांगतोय ना संभाजीनगर झाले’ असे सांगितले होते. टीझरमध्ये त्याच वाक्याचा वापर केला जाणार आहे. सभेतही ठाकरे ‘संभाजीनगर’च्या मुद्द्याला हवा देतील, अशी शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...