आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑक्टोबरमध्ये धोपटेश्वर परिसरातील तारा सुनील शेळके (३२) यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. गोठ्यात चारा टाकण्यासाठी गेल्यानंतर म्हशीने पोटात लाथ मारल्याने त्या गंभीर जखमी झाल्याचे तेव्हा सांगण्यात आले. मात्र, अवैधरीत्या गर्भपातात त्यांचा मृत्यू झाल्याचे नंतर निष्पन्न झाले. याप्रकरणी अपार्टमेंटमध्ये अवैध गर्भपात केंद्र उघडणारा बीएएमएस डॉक्टर श्याममलाल जैस्वाल व नर्स सविता थोरात हे पसार झाले होते.
मात्र, शुक्रवारी जैस्वालला बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. हर्सूल व बेगमपुरा पोलिसांच्या तपासात ताराचा मृत्यू अवैधरीत्या गर्भपात केल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. जटवाड्यातील एका १ बीएचके फ्लॅटमध्ये गर्भपात केंद्र सुरू होते. उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी तपास करत सबळ पुरावे गोळा केले. त्यानंतर डॉ. जैस्वालने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्याचा जामीन फेटाळला. त्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी त्याला अटक करत न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.