आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्या जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला आहे. त्याचा शिवसेनेशी संबंध नाही, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. शिवसेनेच्या सभेसाठीची तयारी पूर्ण झाली आहे. मराठवाड्यातून सर्व जिल्हाप्रमुख आमदार माजी आमदार या सभेला उपस्थित राहणार आहेत. यातच शिवसेना नेते चेतन कांबळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेनिमित्त स्थानिक वृत्तपत्रात दिलेल्या एका जाहिरातीवरून औरंगाबादमधील वातावरण प्रचंड तापले आहे. यावर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली.
कोणाला दुखवायचे नाही...
चेतन कांबळे यांनी दिलेल्या जाहिरातमुळे क्रांती चौकमध्ये भाजपकडून आंदोलन करण्यात आले. याबाबत खैरे यांनी आम्हाला कोणत्याही समाजाला दुखवायचे नाही. चेतन कांबळे याचा आणि आमचा संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाजपचे लावलेले बॅनर केवळ विरोधासाठी आहेत. खोडी करण्याची त्यांची जुनी सवय असल्याचे खैरे यांनी सांगितले. या सभेसाठी भव्य तयारी करण्यात आली आहे. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळपासून शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सभास्थळी ठाण मांडून बसले आहेत.
काय आहे वादग्रस्त जाहिरात?
शिवसेना नेते चेतन कांबळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेनिमित्त स्थानिक वृत्तपत्रात एक जाहिरात दिली होती. 'ज्यादा द्याल 'ताण', तर उलटा घुसेल बाण' असा हा मथळा या जाहिरातीमध्ये होता. तसेच उद्धवजी ठाकरेंना घेराल तर गाठ शिवशक्ती... भीमशक्तीशी आहे. आता एकच नारा- शेंडी,जानव्याला हद्दपार करू. ठाकरे सरकारला आडवे याल तर आडवे करू असे म्हटले आहे. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपचे नेते प्रचंड आक्रमक झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.