आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकलठाणा परिसरातील संतापजनक घटना:नशेखोरांकडून ‘त्या’ महिलेवर सामूहिक बलात्कार, नंतर डोके ठेचून निर्घृण खून

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिकलठाणा परिसरात ३० वर्षीय विवाहितेची दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना रविवारी घडली. मात्र, त्याआधी पीडितेवर सामूहिक बलात्कार व पाशवी अत्याचार केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. नशेखोर राहुल संजय जाधव (१९), प्रीतम ऊर्फ सोनू महेंद्र नरवडे (२४) आणि रवी रमेश गायकवाड (३४, सर्व रा. बकाल वस्ती, चिकलठाणा) अशी त्या नराधमांची नावे आहेत. रवीवर तब्बल ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. परिसरातील त्याच वाटेवरून घरी परतणाऱ्या पीडितेच्या १३ वर्षांच्या मुलाला विमानतळाच्या भिंतीपाशी एक महिला पडल्याची दिसली. घाबरून पळत जात त्याने वस्तीत हा प्रकार सांगितला. सर्वांनी घटनास्थळी धाव घेताच ती त्याचीच आई असल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. वस्तीतील महिलांना हे आरोपी कायम त्रास देत होते. या पीडितेलाही ते सतत त्रास देत होते. रविवारी चर्चमधून ती घरी परतत असताना त्यांनी तिला एकटीला गाठून तिच्याच कपड्यांनी झाडाला बांधत हे अमानुष कृत्य केले.

पोलिसांच्याही अंगाचा थरकाप उडाला : पीडित महिलेचा चेहराही ओळखू येत नव्हता एवढा दगडाने ठेचला होता. धारदार वस्तूने संपूर्ण शरीरावर मारहाण केली होती. तिचे दोन्ही हात डोक्यावर झाडाच्या खोडाला बांधले होते. हे पाहून पोलिसांच्याही अंगाचा थरकाप उडाला. विशेष म्हणजे, हा गुन्हा केल्यानंतरही आरोपी तीन तास तेथेच थांबला होता. श्वानपथक येताच तो पसार झाला. उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, निरीक्षक अविनाश आघाव, गौतम पातारे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना २४ तासांत पकडले.

घाटीत नातेवाइकांचा संताप : सोमवारी घाटीच्या शवविच्छेदन विभागाबाहेर नातेवाइकांसह समाजबांधवांनी गर्दी केली. घटनेची नेमकी माहिती कळत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे, माजी नगरसेवक मनोज गांगवे, संतोष जाटवे, उद्धव गटाचे शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे यांनी समजूत काढल्यानंतर जमाव शांत झाला.

सकाळी अभिनंदन, संध्याकाळी कबुली : या प्रकरणात पोलिसांच्या वर्तनावरही टीका होत आहे. आरोपींना त्यांनी २४ तासांत अटक केली. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता खुनाच्या आरोपींना शोधल्याबद्दल प्रेस नोट काढून स्वत:ची पाठही थोपटून घेतली. संध्याकाळी मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यावर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करीत अत्याचार झाल्याचे मान्य केले.

यापूर्वी पाच घटना : शहरात यापूर्वी पाच वेळेला पाशवी बलात्काराच्या घटना घडल्या. त्यात दोन अत्याचार करून हत्या झाल्या. त्यापैकी केम्ब्रिज परिसरात एका मेडिकल विद्यार्थिनीवर बलात्कार झाला होता. दुसरी एएस क्लब, तर तिसरी घटना भांगसीमाता गड परिसरात घडली. याती विद्यार्थिनीवरील खटल्यात उशिरा बलात्काराचे कलम वाढवल्याने न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले होते.

वयाच्या १४ व्या वर्षापासून गुन्हे रवीवर यापूर्वी लूटमार, चोरी, मारहाणीचे ५० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे आहेत. अनेकदा तो हद्दपार करण्यात आले. मात्र, तरीही पोलिसांनी त्याच्यावर गंभीर कारवाई केली नाही. काही महिन्यांपूर्वीच हद्दपार असतानाही शहरात वावरत असल्याने पोेलिसांनी त्याला पकडले होते. राहुल वयाच्या १४ व्या वर्षापासून गुन्हेगार असून महिलांविषयी गैरप्रकार करण्यासाठी कुख्यात आहे.

कुत्रेवाला नरवडे म्हणून फेमस दोन भाऊ नियमित बटणच्या नशेत तर्र असतात. घराबाहेर पडल्यापासून रात्री घरी परतेपर्यंत दोघांच्या सोबत दोन कुत्रे कायम असतात. विशेष म्हणजे स्वत:सोबतच ते आपल्या कुत्र्यांनाही पावमधून ‘बटण’ खाऊ घालत असल्याची चर्चा आहे. नशेच्या आहारी गेलेल्या या सर्वांची परिसरात मोठी दहशत आहे.