आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चर्चेला पूर्णविराम:दहावी-बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइनच होणार; राज्यमंडळाच्या ऑनलाइन बैठकीत निर्णय

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभ्यासक्रमात 25 टक्के कपात, मात्र प्रश्नपत्रिका मात्र शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा कधी होणार या विषयी सर्वांमध्ये उत्सुकता होती. नुकतेच एप्रिल मे मध्ये या परीक्षा होणार असे जाहिर केल्यानंतर आता परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन अशी चर्चा सुरु झाली होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून, परीक्षा या ऑफलाइन होणार असल्याचे राज्य मंडळाच्या ऑनलाइन मीटिंगमध्ये सांगण्यात आल्याचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी सांगितले.

सोमवारी राज्य मंडळाचे प्रभारी अध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्हयातील शिक्षण उपसंचालक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची समाज माध्यमाच्या आधारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा करण्यात आली. गेल्या दहा महिन्यांपासून देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता 2020 मध्ये परीक्षा न घेताच पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना सुट्या देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी ऑनलाइन वर्ग सुरु करण्यात आलेत. तर नुकत्याच परिस्थिती सुधारत असल्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. तसेच साथरोगाची परिस्थिती पाहता 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. परंतु बोर्डाने प्रश्नपत्रिका मात्र शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारितच केली आहे. राज्य मंडळाच्या अंतिम सूचना आल्यावर 25 टक्के कमी अभ्यासक्रमावरीलच प्रश्नपत्रिका परीक्षेच्या वेळी देण्यात येईल. असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. तर सोमवारी झालेल्या बैठकीत कोरोनामुळे परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन यावर चर्चा होत होती. त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात असणारी विद्यार्थी संख्या आणि त्या तुलनेत आवश्यक सुविधांचा विचार करता ऑनलाइन परीक्षेत अडचणी येवू शकतात. त्यामुळे दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा या ऑफलाइन होणार असल्याचे साबळे यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना अडचणी येवू नयेत यासाठी सर्व ती खबरदारी घेतली जात असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.बी.चव्हाण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...