आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकराव्या अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गांधी भवन येथे झाले. गोविंद पानसरे यांच्या संकल्पनेतून या साहित्य संमेलनाची सुरुवात झाली होती. लोकवर्गणीतून होणाऱ्या या संमेलनासाठी ४ लाखांची वर्गणी संकलित झाली आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनामुळे संमेलन साध्या पद्धतीने होणार आहे. तापडिया नाट्यगृह येथे ३ व ४ डिसेंबरला होणाऱ्या या साहित्य संमेलनाचा खर्च लोकवर्गणीतून उभारण्यात येणार आहे.
मदत निधी संकलनासाठी घरोघरी फेरी काढण्यात आली आहे. मदत फेरीसाठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाच्या पेट्या तयार केल्या होत्या. या शृंखलेतील साहित्य संमेलने कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, अमरावती, नांदेड, बार्शी आदी ठिकाणी झालेली आहेत. या संमेलन शृंखलेतील अकरावे साहित्य संमेलन औरंगाबाद येथे होत आहे. या संमेलनाचे बोधचिन्हाचे प्रकाशन विजय राऊत, प्रदीप सोळुंके, चेतन राऊत, के. ई. हरिदास यांच्या हस्ते करण्यात आले.
डिझायनर रवींद्र खैरनार यांनी डफावर साकारलेले बोधचिन्ह कामगारांच्या हातावर उचललेल्या आणि त्याला लेखणीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या विचारांचा आधार असलेली पृथ्वी आहे. श्रम आणि सर्जन असा धागा यातून साधलेला आहे. मान्यवरांच्या हस्ते मदत निधी संकलन पेटी नवोदित साहित्यिक व कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या. बोधचिन्ह प्रकाशनाप्रसंगी स्वागताध्यक्ष डॉ. सुधाकर शेंडगे, संयोजन समिती अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने, सचिव समाधान इंगळे, डॉ. मच्छिंद्र गोर्डे, अश्फाक सलामी, सुनील उबाळे, शिवनाथ पवार, प्रभाकर अडसूळ आदींची उपस्थिती होती.
साधेपणाने होईल संमेलन
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनामुळे संमेलन अत्यंत साध्या पद्धतीने होणार आहे. प्रगतिशील लेखक संघाचे ते अध्यक्ष होते.
प्रा. समाधान इंगळे, लेखक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.