आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्यापकाच्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान:हृदय मुंबईत, लिव्हर पुण्यात, किडनीसह डोळे मिळाले औरंगाबादच्या रुग्णांना

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद एका प्राध्यापकाने केलेल्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान मिळाले आहे. भाऊ आणि पत्नीच्या समुपदेशनानंतर ही प्रक्रिया पार पडली. सुहास गायके (वय 33) असे त्या प्राध्यापकांचे नाव असून, ते देवगिरी महाविद्यालयातील इल्येट्रॉनिक्स विभागात शिकवत होते. गायके यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे ते ब्रेन डेड झाले होते.

अन् निर्णय घेतला

ओरियन सिटी केअर हॉस्पिटलमध्ये अवयवदानाची प्रक्रिया पार पडली. याबद्दल माहिती देताना डॉ. पांडुरंग वट्टमवार म्हणाले की, रुग्णाला एक तारखेला दवाखान्यात आणले होते. त्याच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे ते ब्रेन डेड झाले होते. आम्ही त्यांच्या कुटुंबातील सर्वांशी चर्चा केली. प्राध्यापक गायके यांचे भाऊ आणि पत्नी यांच्याशी संवाद साधला. त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर अवयवदान निर्णय घेतला.

हृदय मुबंईत, लिव्हर पुण्यात

पांडुरंग वट्टमवार म्हणाले की, कोरोनामुळे अवयवदान प्रक्रिया थांबली होती. मात्र, आता ही प्रकिया सुरू झाली आहे. या रुग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यानंतर हृदय मुंबई, तर लिव्हर पुण्याला पाठवण्यात आले. तर किडनी औरंगाबादच्या सिग्मा आणि बजाज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आली. डोळे देखील बजाज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.

विद्यार्थी प्रिय प्राध्यापक

देवगिरी महाविद्यालयायाचे प्राचार्य उल्हास शिऊरकर सकाळपासून दवाखान्यात उपस्थित होते. ते म्हणाले की, प्राध्यापक गायके मुलांमध्ये लोकप्रिय होते. गेल्या नऊ वर्षांपासून ते देवगिरीमध्ये होते. अनेक विद्यार्थ्यांना ते आर्थिक मदतही करत होते. ते खूप मेहनती होते. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वानाच धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...