आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘तुझको पुकारे मेरा दिल...’, ‘बदन पे सितारे लपेेटे हुए...’, ‘चला जाता हूं किसी की धून में...’अशा ओल्ड इज गोल्ड समजल्या जाणाऱ्या विविध हिंदी गीतांचे सादरीकरण वयाची साठी ओलंाडलेल्या ज्येष्ठांनी केले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ६७ वर्षीय रवींद्र जोशी आणि ६२ वर्षीय शकुंतला जोशी तसेच ६३ वर्षीय अजय कोटणीस आणि ५८ वर्षीय निरुपमा कोटणीस या दांपत्यांनी गाण्याच्या सादरीकरणातून उपस्थित रसिकांकडूनही टाळ्यांची दाद मिळवली.
नाताळसह नववर्षाच्या स्वागतासाठी प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. भरत कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. ‘आम्ही दोघांनी प्रथमच दहा ते पंधरा दिवस गाण्याचा सराव करत तुमच्यासमोर “तुझे जीवन की डोर से बांध लिया है’ हे गाणे सादर करत आहोत,’ असे रवींद्र जोशी व शकुंतला जोशी यांनी सांगितले. अजय कोटणीस आणि निरुपमा कोटणीस यांनीही ‘जब कोई बात बिगड जाये... ’ हे गाणे गायले. ६० वर्षीय राजेंद्र पितृभक्त यांनी ‘कौन है जो सपनो में आया’ हे गाणे सादर करत उपस्थितांकडून दाद मिळवली.
बदन पे सितारे....वर शिट्या प्रकाश गायकवाड यांच्या ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ तर राजेंद्र औसेकर यांच्या ‘चला जाता हूँ किसीकी धून में’ , संजय देशमुख यांनी ‘ ऐसा मौका फिर कहां ,’ स्मिता सोहनी यांनी ‘येऊ कशी प्रिया’ ही गाणी सादर केली. विद्या धूत यांनी कबीराचे दोहे, सुनंदा डबीर, लीला पाटील यांनी स्किट सादर केले.
कथाकथनाने केले तल्लीन अनिल मेटेकर यांनी कॉलेजनंतर पहिल्यांदाच दहा दिवसांच्या तयारीनिशी वि. स. खांडेकर यांच्या ‘दोन मेघ’ वर कथाकथन सादर केले. प्रमोद तोरवी, कांचन देशपांडे यांनी ‘छुप गये सारे नजारे’, अशोक दंडवतंेनी ‘तुझको पुकारे ’,तर मथुरादास देशमुख यांनी शिटीवर ‘तोच चंद्रमा नभात’ हे गीत गायले.
फ्यूजनवर डान्स, कॉमेडीवर हास्य तुषार गाण्यांच्या मैफलीबरोबरच ज्येष्ठांनी फ्यूजन गाण्यावर ताल धरला. यात प्रमोद बेंडे, संजय देशमुख, अजय कोटणीस, निरुपमा कोटणीस, स्मिता सोहनी आणि सुनंदा डबीर सहभागी झाले. ७० वर्षीय अरुणकुमार मुखेडकर यांनी स्टँडअप कॉमेडी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.