आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा सत्र न्यायालयात 2 दिवसांपूर्वी घडला प्रकार:आरोपींनी न्यायालयातून चोरली त्यांचीच संचिका

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा व सत्र न्यायालयातील संचिका वाचायची आहे, असे लिपिकाला सांगून ती घेत तिघे फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नानासाहेब कडुबा घुगे व अन्य दोघांविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयातील लिपिक प्रशांत शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता ते सहकारी विश्वास आस्वार यांच्यासह कामकाज करत हाेते तेव्हा तिघे त्यांच्या दालनात गेले. तेव्हा एका प्रकरणातील आराेपी घुगे तेथे आला.

त्याने संचिकाची मागणी केली. मात्र, शिंदे यांनी त्याला वकिलाला घेऊन येण्यास सांगितले. काही वेळाने तिघे पुन्हा शिंदे यांच्या दालनात गेले तेव्हा शिंदे जेवण करत होते. मात्र, घुगेने फक्त वाचण्यासाठी घेऊ का, असे विचारले असता शिंदे यांनी त्याला हात न लावण्याची सक्ती केली. त्यानंतर शिंदे कडी लावून न्यायालयात निघून गेले. तीन वाजता परतले असता घुगे त्याच्या वकिलासह दालनातून निघून गेल्याचे दिसले. त्यानंतर शिंदे यांनी तपासणी केली असता त्यांना संचिकाच िदसली नाही. त्यांनी वरिष्ठांना कल्पना देऊन वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...