आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी:हर्सूलचे वाढीव 5 एमएलडी पाणी अजून 4 दिवसांनी घरात पोहोचणार

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्याची चाहूल लागल्यावर हर्सूल तलावातील ५ एमएलडी पाणी उपसा वाढवण्यासाठी स्वतंत्र ३५० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. मंगळवारी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचले. ते घरापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आणखी तीन-चार दिवस लागू शकतात. कारण एअर व्हॉल्व्ह, क्रॉस कनेक्शनचे काम पूर्ण होणे अजून बाकी आहे. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने मंगळवारी पाहणी केली असता जलवाहिनीच्या जॉइंटवर गळती होत असल्याचे समोर आले. त्यामुळे दिवसभर गळती बंद करण्यात आली. आता जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत अतिरिक्त ५ एमएलडी (आधी ५ एमएलडी होते) पाणी पोहोचले.

बातम्या आणखी आहेत...