आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:गरजूंना रोजगार देऊन पायावर उभे करण्याचा जायंट्स एलिटचा अजेंडा

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरजवंतांना रोजगारासाठी साह्य करून पायावर उभे करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन जायंट्स एलिटच्या नवनियुक्त अध्यक्षा सारिका सेठी यांनी केले. जायंट्स ग्रुप एलिटचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. अध्यक्षा सारिका सेठी, तर सचिव अर्चना बलदवा यांनी पदाची शपथ घेतली.

कार्यक्रमास माजी महापौर अनिता घोडेले, राजेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकारिणीने जालना येथील एका गरीब महिलेस शिलाई मशीन देऊन प्रकल्पाची सुरुवात केली. मावळत्या अध्यक्षा रूपाली मालाणी यांनी प्रास्ताविक केले. आरती बियाणी यांनी ग्रुपतर्फे महिला सफाई कामगारांसाठी केलेले शौचालय व कोरोना लसीकरण मोहिमेसाठी विशेष गौरवण्यात आले असल्याचे नमूद केले. फेडरेशन डायरेक्टर नंदा मुथा यांनी सदस्यांना शपथ दिली.

बातम्या आणखी आहेत...