आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातव्या वेतन आयोगाची मागणी:विद्यापीठात लेखणी बंद आंदोलन;परीक्षेसह सर्व विभागांचे काम ठप्प, बेमुदत संपाचाही इशारा

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यापीठ परिसरातील हिरवळीवर आंदाेलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना कुलगुरू डाॅ. प्रमाेद येवले. - Divya Marathi
विद्यापीठ परिसरातील हिरवळीवर आंदाेलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना कुलगुरू डाॅ. प्रमाेद येवले.
  • कुलगुरूंनी घेतली आंदोलकांची भेट

सातवा वेतन आयोग, कालबद्ध पदोन्नतीसह विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या १ ऑक्टोबरपासून बेमुदत बंद पुकारण्यात येणार आहे, असा इशारा विद्यापीठ कर्मचारी कृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिला. या आंदाेलनामुळे सर्व कामे ठप्प झाली.

राज्य शासनाने उच्च व तंत्रशिक्षण विभागातील प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केलेल्या आहेत. तथापि, राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयांतील हजारो कर्मचारी, अधिकारी अजूनही या आयोगाच्या लाभापासून वंचित आहेत. यासंदर्भात राज्य शासन-मंत्री यांच्यासोबत वारंवार बैठका झाल्या, पण सातव्या वेतन आयोगासह कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती व अनेक विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालये कर्मचारी संयुक्त कृती समितीने राज्यातील सर्व विद्यापीठांत या आंदाेलनाची हाक दिली हाेती. ३० सप्टेंबरपर्यंत हे आंदाेलन चालेल.

कुलगुरूंनी घेतली आंदोलकांची भेट
कुलगुरू डॉ. प्रमोेद येवले, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय गायकवाड यांना कर्मचाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात ४५० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत. कुलगुरूंनी सायंकाळी आंदोलकांशी चर्चा केली. डॉ. पाथ्रीकर, संघटनेचे अध्यक्ष पर्वत कासुरे, ऑफिसर्स फोरमचे राज्य उपाध्यक्ष डॉ. दिगंबर नेटके यांनी मार्गदर्शन केले. संघटनेचे सचिव प्रकाश आकडे, जीवन डोंगरे, अनिल खामगावकर, डॉ. सुनीता अंकुश आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...