आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी विद्यार्थी:शिवाजी हायस्कूलचे माजी विद्यार्थी 35 वर्षांनंतर भेटले ; गुरुजनांचे डोळे पाणावले

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शिवाजी हायस्कूलच्या माजी विद्यार्थांनी ३५ वर्षांनंतर गोविंदबाग येथे मेळाव्याचा आनंद घेतला. या वेळी अनेक गुरुजनांचे डोळे पाणावले. आठवणीत रमलेल्या विद्यार्थ्यांनाही दाटून आले. शिवाजी हायस्कूलमधून १९८७ मध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन अनेक आठवणींना उजाळा देऊन गेले. तब्बल ३५ वर्षांनंतर एकमेकांना भेटताना काहींचे अंदाज चुकले, काहींचे तंतोतंत बरोबर निघाले. विशेष म्हणजे निवृत्त झालेल्या गुरुजनांनाही विद्यार्थ्यांची नावे पटकन आठवली. मुख्याध्यापक एस. एस. पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. वयाची नव्वदी पार केलेल्या जोगदेव यांच्या मनोगताने वातावरण भावनिक झाले. शिवाजी हायस्कूलमधील छोटेखानी समारंभानंतर औरंगाबादपासून जवळच असलेल्या गोविंदबाग येथे दिवसभर सर्वांनी एकमेकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व गुरुजनांना सन्मानचिन्ह देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...