आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेराचा निष्कर्ष:पावसानंतर धुळीचे प्रमाण दुपटीने वाढले; एक फेरफटका देईल आजारास निमंत्रण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रस्त्यावर साचलेली माती उडून शहरभरात आता धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी काही ठिकाणी महापालिकेने तर काही ठिकाणी नागरिकांनी माती व मुरूम टाकला. ती कोरडी झाल्याने हलकीशी हवा आणि वाहने जाताच धूळ तयार होत आहे. यामुळे सर्दी, खोकला आाणि अंगाला खाज येण्यापासून दम्याचाही धोका आहे. दिवाळीनंतर धुळीच्या प्रमाणात दुप्पट वाढ झाली असून ज्येष्ठ नागरिक, बालके आणि हृदयाच्या रुग्णांना अधिक धोका असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

दिवाळीपूर्वीपर्यंत म्हणजे २२ ऑक्टोबरपर्यंत सुरू असलेल्या पावसाने रस्त्याच्या कडेलगतची तसेच पाण्यासोबत वाहून आलेली माती रस्त्यावर आली. ओलाव्यामुळे ती जमिनीला चिकटून होती. मात्र, दिवाळीसोबत पडू लागलेल्या कडक उन्हाने मातीत कोरडी होऊन धूळ बनून उडत आहे. सेंटर फॉर एन्व्हायरोनमेंटल एज्युकेशन, रिसर्च अँड अवेअरनेस (सेरा) संस्थेने धुळीचा अभ्यास केला. अनेक ठिकाणी धुळीची पातळी धोकादायक असल्याचे सेराच्या समन्वयक गौरी कुलकर्णी यांनी सांगितले. १६ ठिकाणी १२ तास निरीक्षण : ‘सेरा’ने शहरातील १८ ठिकाणांवर सेटलेबल पर्टिक्युलेट मॅटर (एसपीएम) मोजले.

या ठिकाणी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत एक चायना डिश ठेवण्यात आली. डिशचे सुरुवातीचे आणि नंतरचे वजन माेजण्यात आले. दुसऱ्या वजनातून पहिले वजन वजा करून आलेले वजन म्हणजे त्यावर जमा झालेली धूळ होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांप्रमाणे १०० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा अधिक धूलिकण आरोग्यास धोकादायक आहेत. “सेरी’च्या चाचण्यांत १८ पैकी १५ ठिकाणी धूलिकणांचे प्रमाण क्षमतेपेक्षा दुप्पट तर ३ ठिकाणी तिप्पट आढळले आहे.

रेल्वेस्टेशन परिसर- २०३.९८विद्यापीठ गेट - २१०.३ सिटी चौक - २०१.०७,मिल कॉर्नर - २१२.७ हर्सूल टी पाॅइंट - २९८.०९दर्गा चौक - २११.७२ दूध डेअरी - २०४.२७संग्रामनगर पूल - ३११.२६ क्रांती चौक - २१०.६६सेव्हन हिल्स - २११.७६ गुलमंडी - २११.१२गजानन मंदिर - २१०.८७ बसस्टँड - २१०.२एसबी कॉलेज - २०३.९६ चिकलठाणा - २२१.३विमानतळ - २९१.०९ टीव्ही सेंटर - २२५.४रोशन गेट - २०६.०९ (धुळीचे प्रमाण मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर)

श्वसनाच्या आजारांचा धोका
धुळीमुळे फुप्फुसाशी म्हणजे श्वसनाशी संबंधित आजार दमा, क्रॉनिक ब्रांकायटिस्ट, सीओपीडी आजाराचा धोका बळावतो. जास्त वेळ धुळीच्या संपर्कात आल्याने दम्याचा अटॅक येऊ शकतो. धुळीसोबत थंडी वाढल्याने स्मॉग तयार होतो. स्मॉग खालच्या थरात राहिल्याने अधिकच गंभीर ठरतो. धुळीमध्ये कॅन्सरला निमंत्रण देणारे घटक असल्यास कॅन्सरचीही शक्यता असते. डॉ. पंकज जोशी, हृदयरोगतज्ज्ञ

तात्कालिक उपाय
धुळीच्या ठिकाणी वाहनांची गती कमी ठेवणे रस्ते स्वच्छ करणे धुळीवर पाणी फवारणे रस्त्याच्या दुतर्फा व डिव्हायडरमध्ये झाडे लावल्याने धुळीचे प्रमाण कमी होते.

बातम्या आणखी आहेत...