आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:व्यापाऱ्याची रक्कम लंपास, तिसऱ्या आरोपीला कोठडी

छत्रपती संभाजीनगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कापूस व्यापाऱ्याची कार अडवून पिस्तुलाचा धाक दाखवून, काठीने कारच्या काचा फोडत मारहाण करून २७ लाख ५० हजारांची रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. देविदास शामलाल रोरे (४०, रा. हनुमान मंदिराच्या बाजूला, गांधेली, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव असून त्याला १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. गुणारी यांनी दिले. या प्रकरणात साईनाथ मनोहर तायडे (५४, रा. देवळी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी दीपक बर्डे आणि प्रवीण राऊत या दोन आरोपींना अटक झाली होती. बर्डे याने हेमंत वाघ आणि देविदास रोरे यांच्या साथीने गुन्हा केल्याची तसेच हेमंत वाघने पिस्तुलाचा दाखवल्याची कबुली दिली होती.

बातम्या आणखी आहेत...