आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी शिरीष बोराळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नियुक्तीनंतर दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही अद्याप कार्यकारिणीची घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपमधील केंद्रीय मंत्री, राज्यातील कॅबिनेट मंत्री, आमदार, प्रदेश पदाधिकारी यांच्या समर्थकांसाठी कार्यकारिणीची घोषणा लांबली असल्याचे पक्षातून बोलले जात आहे. बोराळकर यांच्यावर वरिष्ठांचा समर्थकांना स्थान देण्यासाठी मोठा दबाव असल्याची चर्चा आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा भाजपच्या कार्यकारिणीत वर्णी लागावी यासाठी अनेकांनी आपली ताकद पणाला लावली आहे. विविध आघाड्यांचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी अनेकांनी आपले देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. महापालिका निवडणुकीपर्यंत तरी एखादे पद मिळावे अशी अनेकांची इच्छा असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
लाॅबिंग होत नाही लॉबिंग संकल्पना भाजपमध्ये चालत नाही. काम करणाऱ्या कार्यकर्त्यास नेहमी न्याय दिला जातो. भाजपच्या विविध बैठका, अभियान सुरू आहेत. सकल हिंदू समाजाच्या मोर्चाची तयारी सुरू आहे. राज्यात कुठेच कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील कार्यकारिणी जाहीर केली नाही. दबावाखाली काम करीत नाही. - शिरीष बोराळकर, शहर जिल्हा अध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.