आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅन्टी करप्शन विभागाचा अजब कारभार:भ्रष्टाचार करणाऱ्यांनाच चौकशीचे आदेश, खासदार इम्तियाज जलीलांनी व्यक्त केला संताप

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत जो घोटाळा झाला होता त्याच विभागाला तब्बल दोन वर्षानंतर चौकशी करण्याचे आदेश दिल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारभारावर त्यांनी सवाल उपस्थित केला आहे.

भविष्य निर्वाह निधी कार्यालय, कामगार कार्यालय यांच्यासोबत हातमिळवणी करुन कामगारांना मिळालेल्या मजुरीतुन लेव्हीच्या नावाखाली 30 टक्के रक्कम वसुली करुन औरंगाबाद माथाडी व असंरक्षीत मंडळ संचालकांनी कोट्यावधीची लूट केली केल्याची लेखी तक्रार खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती.

प्रधान सचिव कामगार विभागाला आदेश

22 डिसेंबर 2021 रोजी खा. जलील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक (अ‍ॅन्टी करप्शन) विभागाकडे याबाबत तक्रार नोंदवली होती. तब्बल दोन वर्षानंतर 25 जुलै 2022 रोजी अपर महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या मान्यतेने अपर पोलीस अधिक्षक, (मुख्या-१) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी थेट प्रधान सचिव कामगार विभागालाच चौकशी करुन अहवाल सादर करण्याची विनंती केली.

औरंगाबाद माथाडी व असंरक्षीत कामगार मंडळात नोंदणीकृत माथाडी कामगारांची वर्षानुवर्षे आर्थिक पिळवणुक होत असल्याने अनेक माथाडी कामगारांनी थेट खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे सविस्तर माहितीसह निदर्शनास आणुन दिले होते.

फसवणूक व भ्रष्टाचार

या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद माथाडी व असंरक्षित कामगार मंडळात झालेल्या करोडो रुपयाच्या अपहाराची व तक्रारीत नमुद सर्व मुद्दयांवर सखोल चौकशी होऊन, संबंधित अध्यक्ष, कार्मिक अधिकारी व मंडळाचे सचिव यांच्या विरुध्द अपहाराचा, फसवणूकीचा व भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी व गरीब कामगारांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी कामगारांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती.

लाचलुचपत विभागावर दबाव

माथाडी कामगारांना न्याय न देता उलट कोट्यावधी रुपयाचा महाघोटाळा करणाऱ्या माथाडी मंडळ, भविष्य निर्वाह निधी विभाग व कामगार विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालुन त्यांना अभय देणारे तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर दबाव आणून प्रकरण लपविण्याचा प्रयत्न करणारे व चौकशीत अडथळा निर्माण करणारे सर्व संबंधितांची सखोल चौकशी करुन कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे

बातम्या आणखी आहेत...