आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारीपदी राम कदम यांची नियुक्ती, कार्यकर्त्यांनी 200 किलो वजनाच्या पुष्पहाराने केले स्वागत

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीत युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल राम कदम यांचा मित्रमंडळाच्या वतीने रविवारी ता. 15 सायंकाळी सत्कार करण्यात आला. यावेळी उत्साही मित्रमंडळींनी तब्बल 40 फुट लांबीचा अन 200 किलो वजनाचा पुप्षहार घालून त्यांच्या निवडीचे स्वागत केले. शिवसेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांचे खंदे समर्थक असलेले राम कदम यांनी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता आमदार बांगर यांच्या सोबत राहून पक्षाचे काम चालविले आहे.

राम कदम यांच्या कामाची दखल घेत त्यांची युवा सेनेच्या जिल्हा युवा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. कदम यांची नियुक्ती जाहीर होताच शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. यावेळी बोलतांना राम कदम म्हणाले की, युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदार संतोष बांगर यांच्या माध्यमातून तसेच मार्गदर्शनाखाली शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. युवा सेनेने टाकलेली जबाबदारी सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन कदम यांनी यावेळी केले.

सकार सोहळ्याप्रसंगी संतोष गोरे, शाम कदम, कपील शेवाळे, प्रफुल्ल सुर्यवंशी, प्रताप चौदंते, अतुल जाधव, विरसिंह चव्हाण, विशाल देशमुख, शेख हानीफ, शेख वसीम, अमीत पवार, रवीराज धुळे, कैलास मनबोलकर, सिध्दार्थ पंडीत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...