आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझोप उडवली सरकारची कोरोना इथं आला हो...कलावंत घरात बसला हो, इथं आला सरकारचा कोरोना हो... अशी गीतं सादर करत लोककलावंतांनी गुरुवारी आपल्या व्यथा मांडल्या.कोरोना काळापासून लोक कलावंताचे मानधन रखडले आहेत.शासनाने ते वाढवून थकबाकीसह द्यावे, अशी मागणी लोककला महोत्सव समितीचे प्रमुख एकनाथ त्रिभुवन यांनी केली. विभागीय आयुक्तालयासमोर झालेल्या या आंदोलनात रतनकुमार पंडागळे, हरिदास भोसले, अशोक पगारे, दादा धोतरे आदींचा सहभाग होता. अ वर्गाच्या कलावंताना ३१५०, रुपये ‘ब’ वर्गासाठी २८०० आणि ‘क’ वर्गासाठी केवळ २२५० रुपये मानधन मिळते. ते अनुक्रमे ७५००, ६५००, ५५०० रुपये करावे, अशी मागणी कलावंतानी निवेदनातून केली. कला संवर्धन व उद्योग व्यवसायासाठी वामनदादा कर्डक महामंडळ स्थापन करून निधी द्यावा, कलावंतांना घरकुल योजनेत आरक्षण असावे. तमाशा कलावंतांना पोलिस सरंक्षण द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.