आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारे प्रदर्शन:यशवंत महाविद्यालयात 12 डिसेंबरपर्यंत रसिकांना पाहता येतील कलाकृती

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांकडे शासन कायम दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दीपक अंकलखोपे या युवकाने कलाकृतींतून मांडले.यशवंत कला महाविद्यालयात ६ डिसेंबर रोजी शेतांबरी चित्रकलाकृतींचे प्रदर्शनाला सुरूवात झाली. प्रदर्शनाचे उद्घाटन मिलिंद कंक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रवींद्र तोरवणे यांची उपस्थिती होती. प्रदर्शनात शेतकरी या विषयावर ४५ चित्रकलाकृती मांडण्यात आल्या.

शेतकरी आत्महत्येवर आधारित मॉडेल : चित्रप्रदर्शनात इन्स्टाॅलेशनमध्ये शेतकरी आत्महत्येवर आधारित मॉडेल मांडण्यात आले. त्यात बुजगवण्याच्या रूपात शेतकरी दाखवला असून त्याच्या बाजूला कावळा म्हणजेच समाज दाखवला. जो की कावळ्याप्रमाणेच शेतकऱ्याचे लचके तोडत आहे. तसेच बल्बच्या रूपात इतर समाज जो फक्त हे बघण्याचे काम करत असल्याचा संदेश यातून दिला. शेतकरी समस्या जवळून पाहिल्याने हे शक्य झाले, असे दीपक म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...