आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैदराबादमध्ये वर्षभर शाकाहारी मेस चालवणारे हैदराबाद येथील अवद बिन सलाम हे मागील ३५ वर्षांपासून रमजान महिन्यात रोशन गेटला मुक्कामी येतात. ते येमेन व अरब राष्ट्रांतील खास पक्वान्न म्हणून परिचित असलेला स्वादिष्ट अरबी हरीस बनवत. त्यांच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्य अली बिन अवद त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. हैदराबाद व उत्तर प्रदेशातील लाेक अरबी हरीस तयार करून विकतात. शहरात किमान १५० च्या अरबी हरीसचे स्टाॅल लागले आहेत. परंतु अली बिन अवद कुटुंबीयांनी तयार केलेल्या अरबी हरीसची खवय्ये वर्षभर प्रतीक्षा करतात.
रमजान महिन्यात शहरात विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असते. उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगण, हैदराबाद आदी राज्यांतील शेफ हे पदार्थ तयार करण्यासाठी बाेलावले जातात. अरबी हरीस हा खवय्यांसाठी अत्यंत आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे हैदराबाद येथील अली बिन अवद कुटुंबीय दरवर्षी येऊन हा पदार्थ तयार करून विकतात. हरीस मूळचा येमेन व अरब राष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. याची पाककृती अतिशय वेगळी आहे. ५० पेक्षा जास्त प्रकारचे मसाले, मटण, आठ प्रकारच्या डाळी, गहू वापरून हरीस तयार केला जाताे. विशेष म्हणजे गोड व तिखट असे दोन्ही प्रकारचे हरीस एकाच भांड्यात तयार करता येतात. हरीस तयार करण्यासाठी किमान १२ तास लागतात. त्यामुळे पहाटे चार वाजेपासूनच कारागीर कामाला लागतात. तो दुपारी चार वाजेपर्यंत तयार होऊन खवय्यांसाठी उपलब्ध होतो.
मूळ अरब राष्ट्रातील येमेनचे पक्वान्न येमेन व अरब राष्ट्रांत गहू पिकत नसल्याने त्या ठिकाणी गंदम हे गव्हासारखे धान्य वापरण्यात येते. त्याला दोन ते तीन तास कुटणे, शिजवणे, तीन तास मसाले व सर्व डाळी टाकून त्यांना घोटणे अशा विविध प्रक्रियेतून अरबी हरीस तयार होतो.
कसा तयार होतो अरबी हरीसॽ उडीद, चणा आदी विविध आठ प्रकारच्या डाळी, गहू भिजवून ठेवले जातात. नंतर ते कुटून शिजवणे, त्यात विविध मसाले व कोथिंबीर, कांदा, पुदिना टाकले जाते. नंतर मटण टाकून शिजवून त्याला किमान तीन तास घोटले जाते.
एकाच भांड्यात बनतो दोन चवींचा हरीस एकाच भांड्यात गोड व तिखट हरीस तयार करण्यात येतो. विशेष म्हणजे गाेड व तिखट हरीस एकत्रित होत नाही, हेसुद्धा त्याचे वेगळेपण आहे. पोटली का मसाला अरबी हरीसमध्ये ‘पोटली का मसाला’ टाकण्यात येतो. तो मसाला कधी हरीसमध्ये तर कधी तर्रीमध्ये मिसळण्यात येतो. त्यामुळे हरीसला वेगळी चव येते. हा पोटलीचा मसाला कारागीर हैदराबादहून आणतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.