आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातिवाचक शिवीगाळ:सरपंचाला जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरपंचाला जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी भगवान काशीराम कोल्हे, नारायण काशीराम कोल्हे (दोघेही रा. करंजखेडा, ता. कन्नड) यांनी सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी फेटाळला.

याप्रकरणी करंजखेडा गावच्या सरपंच संगीता कैलास सोनवणे (४९) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार पिशोर ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपी भगवान कोल्हेच्या विरोधात यापूर्वी पिशोर ठाण्यात तीन गुन्हे दाखल असून त्यातील दोन गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. तर आरोपी नारायण कोल्हेविरोधात ६ गुन्हे दाखल असून त्यातील दोन गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला असता, सहायक लोकाभियोक्ता मधुकर आहेर यांनी आरोपींची गावात दहशत असून त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. ते फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणण्याची दाट शक्यता आहे. आरोपींना जामीन दिल्यास ते पुन्हा फिर्यादी व त्यांच्या कुटुंबासह वादविवाद करुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत आरोपींच्या जामिनाला विरोध केला.

बातम्या आणखी आहेत...