आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:कुपोषित बालकांच्या पोषण आहारासाठी किर्तनाचा आधार, 9 तालुक्यांत बालके 1333 अतितीव्र कुपोषित

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तर गंगापूरमध्ये अधिक़ 1 हजार ४७६ मध्यम कुपोषित तर २४१ अतितीव्र कुपोषित

औरंगाबाद जिल्हयातील कुपोषित बालके आढळून आलेल्या गावांमध्ये आणि शहरालगत भागात किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली. यात संत साहित्य, कुराण, गाथा यात दिलेल्या ओळींचा आधार घेण्यात येईल. या संदर्भात नियोजन सुरु असून, जि.प. आरोग्य विभाग आणि महिला व बालविकास विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात गंगापूरमध्ये अधिक १४७६ मध्यम कुपोषित आणि २४१ अतितीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत.

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास आणि आरोग्य विभागातर्फे १७ ते ३१ ऑगस्टपर्यंत ० ते ६ या वयोगटातील बालकांमधील तीव्र व मध्यम कुपोषित बालकांसाठी विशेष धडक मोहिम राबविण्यात आली. यात ३४५५ अंगणवाड्यांमध्ये २ लाख १० हजार बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. ज्यात ९ तालुक्यांमध्ये १३३३ बालके ती अतितीव्र कुपोषित आणि ७४६१ बालके ही मध्यम कुपोषित आढळून आली आहेत. जून मध्ये झालेल्या सर्वेक्षणात हा आकडा ३४३ आढळून आला होता. हळूहळू हे प्रमाण वाढतांना दिसून येत असल्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्वेक्षणात आढळून आलेल्या आकडेवारीत ज्या बालकांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात येईल असेही मिरकले म्हणाले. तर ग्रामीण भागात अधिक पोषण आहार विषयी अधिक जागृक्ता व्हावी. मुलांच्या योग्य आहारा विषयी माता-पिता पालकांमध्ये साक्षरता वाढावी या हेतूने किर्तनकारांची मदत घेतली जाणार असून, त्यासाठी युनिसेफचे प्रतिनिधी डॉ.पांडुरंग सुदामे यांचे सहकार्याने संत साहित्य, गाथा, कुराण यातील ओळींचा आधार घेतला जाणार आहे. प्राथमिक स्तरावर ही तयारी सुरु आहे.

पुन्हा तीन महिन्यांनी सर्वेक्षण आता आढळून आलेल्या कुपोषित बालकांवर अंगणवाडीताई लक्ष ठेवून असतील. त्यांच्या पोषणासाठी एनर्जी डेनसिफाइड न्युट्रीशियस्ट फुड पॅकेट प्रत्येकास देण्यात येईल. तसेच पुन्हा डिसेंबरमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

ही आहेत कुपोषणाची कारणे -
बालविवाह, योग्य वयात योग्य आहार न मिळणे, गर्भावस्थेत पुरक आहाराची कमी, अपूर्ण दिवसांचे बाळ, आई अॅनिमिक असणे, दोन मुलांमध्ये योग्य अंतर नसणे, बाळंतपणानंतरही योग्य आहार न ठेवणे, बाळाला सहा महिने स्तनपान आवश्यक आहे.

किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती -
कुपाषित बालकांच्या सर्वेक्षणात वजन आणि उंचनीच्या तुलनेत त्यांचा आहार कमी आहे. अशी उंचीनुसार अतितीव्रकुपोषित १३३३ बालके आढळून आली आहेत. तर मध्यम कुपोषित ७ हजार ४६१ बालके आढळून आली आहेत. बालकांच्या पोषण आहार, मातेचा आहार या विषयी जनजागृती करण्यासाठी किर्तनाच्या माध्यमातून जागृक्ता केली जाईल. यासाठी काम सुरु आहे. कुपोषित बालकांचे मॉनिटरिंग अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

प्रसाद मिरकले जि.प. महिला व बालविकास अधिकारी
अशी आहे कुपोषित बालकांची तालुका निहाय आकडेवारी
अतितीव्र कुपोषित - औरंगाबाद १७४, गंगाूपर २४१, फुलंब्री ७०, कन्नड २२१, सिल्लोड १८५, पैठण १६४, खुलताबाद १८, वैजापूर ११३, सोयगाव १४७ एकूण १३३३
मध्यम कुपोषित - औरंगाबाद १३४९, गंगापूर १४७६, फुलंब्री ४३५, कन्नड ९०४, सिल्लोड ७०९, पैठण ५९७, खुलताबाद २६८, वैजापूर ८८८, सोयगाव ८३५ एकूण ७४६१

बातम्या आणखी आहेत...