आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:खंडपीठाच्या आदेशामुळे कैद्याला करता आला वडिलांचा अंत्यविधी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी सुटी असताना सुनावणी घेऊन शिक्षेला तात्पुरती स्थगिती देत कैद्याला तात्पुरता जामीन दिला. त्यामुळे त्या कैद्याला त्याच्या वडिलांचा अंत्यविधी व इतर धार्मिक विधी पार पाडता आले. मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली १९ जानेवारी २०२३ पासून कारावासाची शिक्षा भोगत असलेला कैदी प्रदीप अर्जुन हवाळे याच्या वडिलांचे २७ जानेवारी रोजी रात्री निधन झाले. अंत्यविधीमध्ये सहभागी होता यावे यासाठी त्याने दाखल केलेल्या अर्जावर खंडपीठाने तात्पुरता जामीन मंजूर केला. प्रदीपतर्फे ॲड. कमलाकर सूर्यवंशी यांनी, तर शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र सानप यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...