आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटित असल्याचे लपवून केले दुसरे लग्न:गुन्हा रद्द करण्याची मागणी खंडपीठाने फेटाळली

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घटस्फोटित असल्याचे लपवत दुसरे लग्न करूनही विवाह संकेतस्थळावर स्वत:चे स्टेटस अविवाहित ठेवले. बंगळुरू येथे आयटी क्षेत्रात काम करणारा हा भामटा एवढ्यावरच थांबला नाही. त्याने आणखी नऊ मुलींना लग्नासाठी मागणी घातली तेव्हा त्याचे बिंग फुटले. त्याच्या पत्नीने नगर पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली. आपल्यावर दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी या भामट्याने केली. मात्र, खंडपीठाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई व न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी त्याची मागणी फेटाळून लावली. कुणाल नंदकुमार जगताप (४०) याची नगर येथील तरुणीची ओळख झाली. २०१८ मध्ये त्यांनी लग्न केले. त्याचे अनेक मुलींशी संबंध असल्याचे संबंधित तरुणीस समजले. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...