आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशोगाथा:सेवा, उत्पादनाला एमएसएईच्या साच्यामध्ये बसवल्यास मिळेल योजनांचा लाभ

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेवा आणि उत्पादनाला एमएसएईच्या साच्यात बसवल्यास सर्वांना योजनांचा लाभ मिळेल, असे मत एमएसएईचे सहायक संचालक सुभाष इंगेवार यांनी व्यक्त केले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई), वसुंधरा सामजिक संस्था, औरंगाबाद आणि मुंबईतील झेप उद्योगिनी संस्थांच्या वतीने आापल्यातील उपजत कौशल्य तंत्र आणि सरकारच्या योजनांची जोड देऊन उद्योजक बनण्यासाठी शुक्रवारी एमएसएमई कार्यालयात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.

या वेळी झेप उद्योगिनीच्या संचालिका पूर्णिमा शिरीषकर, सिपेटच्या मौसम चौधरी, आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शक डॉ. अनिल जाधव, वसुंधरा एनजीओच्या संस्थापक अॅड. सुदर्शना जगदाळे उपस्थित होते. या वेळी १५० महिलांनी सहभाग नोंदवला होता. अॅड सुदर्शना म्हणाल्या, औरंगाबादेत अनेक महिला काही ना काही उद्योग करत आहेत. पण या उद्योगांना मोठ्या पातळीवर कसे न्यावे, आपल्याला ते जमेल का, अशी भीती त्यांच्या मनात असते. त्यामुळे अशा कार्यशाळांच्या माध्यमातून त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील, असा या आयोजनाचा हेतू असल्याचे त्या म्हणाल्या. उत्पादन आणि सेवा यातील फरक इंगेवार यांनी समाजावून सांगितला. महिला अनेक प्रयत्न करून उद्योग उभारतात. त्यांच्यात असंख्य क्षमता असतात. पण, मोठ्या उद्योगात परावर्तित करण्याचे पाऊल उचलण्यास त्या माघार घेतात. पण, तुम्ही पुढे या, शासन तुमच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...