आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठेकेदाराला वारंवार नोटीस देऊनही कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता कांचनवाडीतील बायोगॅस प्रकल्प महापालिकाच चालवणार आहे. वीज खंडित केल्याने मागील तीन महिन्यांपासून प्रकल्प बंद आहे. कंत्राटदार कंपनी इंदूरच्या बँको सर्व्हिसेसला आता अंतिम नोटीस दिली आहे.
शहरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा ३० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प मनपाने कांचनवाडीत सुरू केला हाेता. त्यातून ना बायोगॅस मिळतो ना वीज मिळते तरीदेखील या प्रक्रिया केंद्रासाठी शहरातील सुमारे २० मेट्रिक टन एवढा ओला कचरा पुरवला जातो. इंदूरच्या बँको सर्व्हिसेसने प्रक्रिया केंद्राचे सुमारे ५ ते १० लाख रुपये वीज बिल थकवले आहे. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी केंद्राचा वीजपुरवठा खंडित केला गेला. पालिकेच्या घनकचरा विभागाने एजन्सीला तीन नोटिसा बजावल्या तरीदेखील हे केंद्र सुरू केले नाही. तसेच प्रशासकांनी बोलावलेल्या बैठकीस एजन्सीचे प्रतिनिधी हजर राहिले नाहीत. त्यामुळे घनकचरा विभागाने ५ डिसेंबरला करार का रद्द करू नये? अशा आशयाची नोटीस व २० डिसेंबरला अंतिम बैठक बोलावली होती.
प्रशासक म्हणाले, खुलासा असमाधानकारक कंत्राटदाराने बैठकीत सादर केलेला खुलासा असमाधानकारक आहे. त्यामुळे आता वीज बिल स्वतः भरून हा प्रकल्प पालिकाच चालवणार आहे. याविषयी कंपनीला अंतिम नोटीस दिल्याचे प्रशासक डाॅ. अभिजित चाैधरी यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.