आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • ZP Higoli Updates: BJP MLAs Tanaji Mutkule Have Slammed The Office Bearers For Trying To Cancel The Work Of Zilla Parishad Members; News And Live Updates

हिंगोली:जिल्हा परिषद सदस्यांची कामे रद्द करण्याचा घाट घातल्यास गाठ आमच्याशी आहे, भाजपा आमदारांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावले

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावेळी आमदार मुटकुळे यांनी सर्व परिस्थिती मांडली.

हिंगोली जिल्हा परिषदेत काही जिल्हा परिषद सदस्यांची कामे रद्द करण्याचा घाट घातल्यास गाठ आमच्याशी आहे अशा शब्दात भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी मंगळवारी (ता. 22) जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी पदाधिकारी व अधिकाऱ्यांना ठणकावले आहे. यावेळी त्यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्माची यांची भेट घेतली. हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता आहे. मागील काही दिवसांपुर्वीच माजी शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल झाला. त्यानंतर त्यांच्या काळात मंजूर झालेली व प्रशासकिय मान्यता दिलेली कामे रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेचे राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे.

भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ. सुवर्णमाला शिंदे यांच्या पांगरा शिंदे गटातील जिल्हा परिषद शाळा इमारत दुरुस्तीच्या कामाची निविदा काढल्यानंतरही या कामाबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अडवणुक केली जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. या शिवाय इतर कामेही रद्द करण्याचे प्रयत्न पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहेत. या प्रकारानंतर आज आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी शर्मा यांची भेट घेतली. यावेळी माजी सभापती चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अजित मगर, ॲड. के. के. शिंदे, रामरतन शिंदे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार मुटकुळे यांनी सर्व परिस्थिती मांडली. विनाकारण कामे थांबवली जाऊ नयेत अशी आमची भुमीका असून आपण याकडे लक्ष घालण्याचेही आमदार मुटकुळे यांनी सांगितले. त्यानंतर आमदार मुटकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेत प्रशासकिय मान्यता दिलेली कामे कामे रद्द करण्याचे प्रयत्न करणे, हेतुपुरस्सर सदस्यांची अडवणुक करणे या प्रकार सुरु असल्याचे सांगत तिव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषद सदस्यांना मुद्दाम वेठीस धरून त्यांची कामे रद्द केल्यास गाठ आमच्याशी आहे अशा शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...